punjab election 2022: काॅग्रेसची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली :  देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काॅग्रेस पक्षाकडून आपल्या ८६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, पंजाब  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सीएम चन्नी आणि सिद्धू यांच्याशिवाय प्रताप सिंग बाजवा यांना कादियान मतदारसंघातून, सुखजिंदर सिंग रंधावा यांना डेरा बाबा नानकमधून आणि हरिंदर पाल सिंग मान यांना सनौर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Share