MPSC : आणखी एका तरुणाचा मृत्यू

पुणेः  एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका उमेदवाराने आत्महत्या केली आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. आता पुण्यातील अमर मोहीत याने आत्महत्या केली आहे.

अमर पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षणरद्द झाल्यामुळे अमर हा पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमर हा सांगलीचा रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

Share