पंजाबमध्ये काॅंग्रेसला धक्का; आपची जोरदार मुसंडी

पंजाब :  देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काॅँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. पंजाबमध्ये  सुरुवातीच्या निकालात आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.  आपचे उमेदवार ६२ जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार ३७ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार केवळ ३ जागांवर आघाडीवर असल्याच समोर आलं आहे.

राज्यातील सत्ताधारी काॅँग्रेस पक्षातील नेते नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्याअमृतसर ईस्ट या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे दिसते आहे. तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाळा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. इतक नव्हे तर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे भदोडमधून सध्या पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री चमकौर साहिब या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवत आहेत.

काेण किती जागांवर लढलंय 

पंजाबमध्ये ११७ जागांपैकी भाजपने ७१ जागा लढवल्या आहेत. त्यांचा मित्र पक्ष पंजाब लोक काँग्रेसने २७ आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त)ने १५ जागा लढवल्या आहेत. शिरोमणी अकाली दल ९६ , बसपा २०, आम आदमी पार्टी ११७ आणि काँग्रेसनेही ११७ जागा लढवल्या आहेत.

Share