‘इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…’ यादवांचे ट्विट चर्चेत

उत्तर प्रदेशः  देशातील अत्यंत महत्त्वाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या काही तासांत हाती येणार आहेत. तर उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केले आहे. अखिलेश यादव यांनी आपला पूर्ण जोर या निवडणुकीत लावले आहे. तर अखिलेश यादव यांचे हे ट्वीट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवल्याबद्दल त्यांनी सपा कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मतमोजणी केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात थेट लढत पाहायला मिळत आहे.

 

अखिलेश यादव यांनी ट्वीट मध्ये म्हटले की, ”’इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का’ मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि सतर्कतेनं कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे पाईक’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील!”

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचे आव्हान आहे.

Share