“पुष्पा”आता हिंदीतही प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धमाकेदार चित्रपट ‘पुष्पा’ प्रदर्शनानंतर अॅक्शनमुळे बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं मोठी कामई केली आहे. त्यानंतर ७ जानेवरीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र हिंदी भाषेत हा चित्रपट अद्याप ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला नाही. त्यामुळे हिंदी भाषेत हा चित्रपट कधी रिलीज होणार यांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली होती .पण आता लवकरच हा चित्रपट हिंदी भाषेतही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

हिंदी भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जेव्हा ७ जानेवारीला हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हापासून प्रेक्षक याच्या हिंदी व्हर्जनची आतुरतेनं वाट पाहताना दिसत होते. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. येत्या १४ जानेवरीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Share