राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब अशी की या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पहिल्यांदाच गपती आणला जाणाह आहे. यांचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर बंगल्यावर गेले असावेत, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरे हे अलीकडच्या काळात सातत्याने हिंदुत्त्वाला पुरक भूमिका घेताना दिसत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर सर्वांचे लक्ष आहे. अशातच आता राज ठाकरे हे पहिल्यांदा आपल्या घरातून बाहेर पडून दुसऱ्य कोणाच्या घरी गेले आहेत. आतापर्यंत भाजपचे सर्व नेते किंवा अन्य लोक हे शिवतीर्थ येथे येऊन राज ठाकरे यांची भेट घ्यायचे. मात्र, आज राज ठाकरे हे अनेक दिवसांनी स्वत:च्या घराबाहेर पडून एखाद्या राजकीय नेत्याच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांच्या या कृतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

Share