संदीपान भुमरे हे गावठी मंत्री- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संदिपान भुमरे हे गावटी मंत्री आहेत, त्यामुळे ते काहीही बोलत राहतात, अशा शब्दात खैरेंनी भुमरेंवर टीका केली. शिंदे गटात गेलेले काही आमदार मला फोन करुन म्हणतात की, आमचं चुकलं.तिकडे गेलेले १० ते १२ आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे सोबत असणारे २ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. आमच्याकडचं कुणीही शिंदे गटात जाणार नाही. पण उलट यांचे ४० आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले १०-१२ आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं.

दरम्यान, मंत्री भुमरे यांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देताना खैरे म्हणाले की, “संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, मी सुरूवातीपासून त्यांना सांभाळलं आहे. नशीबाने ते आमदार झाले आहेत. त्यामुळे आमच्या संपर्कात दोन आमदार आहेत असं बोलणं चुकीचं आहे. उलट शिंदे गटातीलच १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत.” अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.

Share