राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा; १ में रोजी औरंगाबादेत सभा तर ५ जूनला अयोध्या दौरा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापवले आहे. ‘देशातील हिंदुंनो तयार रहा. ३ मे पर्यन्त त्यांना कळाल नाही तर जशास तस उत्तर देऊ’ असा इशारा त्यांनी आज दिला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी दोन मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेणार असल्याच त्यांनी जाहीर केल आहे. तर ५ जून रोजी आपण आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भोंग्याचा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्याचा त्रास केवळ हिंदूंना नाही, तर मुस्लिमांनाही होतोय. हा विषय सामाजिक आहे. त्याकडे त्या अंगाने पाहावे. मला कल्पना नाही कोण व्यक्ती आहे. इथे एक मुस्लीम पत्रकार आहेत. ते नांदगावकरांना भेटले आणि सांगितले माझे लहान मुल जन्माला आले, तेव्हा सकाळची बांग आणि अजान दिली जायची. मी स्वःत मशिदीत जाऊन त्यांना गोंगाट होतोय, तो बंद करा सांगितले. हा त्रास केवळ हिंदूंना नाही मुस्लिमांनाही होतोय. हा विषय अनेक वर्षापासुन सुरू आहे, पण तसाच आहे. तो पुढे गेला नाही. त्यामुळे तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ च्या मुद्द्यावर उत्तर..

PFI नेता मतीन शेखानी यांनी भोंग्यांवरुन राज ठाकरेंना ‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ असा इशारा दिला होता. यावर राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आमच्याकडून मिरवणुका निघतात त्यावर दगडफेक होत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो, इतर शस्त्र हातात घेता येतात. हे सर्व करायला भाग पाडू नका, अस म्हणत राज ठाकरेंनी जोरदार उत्तर दिल आहे.

Share