राज ठाकरेंची मोठी खेळी ! नागपुरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त

नागपुर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी मनसेची नागपूर शहरातील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त  करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. १६ वर्ष पक्षाला झाली आहे. त्यामुळे मला येथे ज्या पद्धतीचा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये. अनेक होतकरू तरून सध्या नागपुरात विदर्भात आहेत. त्यांना योग्य संधी देणे. त्यांना वर आणणे आणि त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने काम करणे योग्य असते.

नागपुरात प्रस्थापितांविरोधात लढा द्यावा लागेल, या कालच्या बैठकीतील विधानावर बोलताना राज म्हणाले, प्रत्येकजण जेव्हा मोठा होतो तेव्हा तो प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठा होतो. विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्लाह म्हणून ओळखला जायचा. आता आता तो भाजपचा आहे. इथे जर भाजप प्रस्तापित असेल, तर त्यांच्या विरोधातच लढावे लागेल. मात्र, याचवेळी राजकारण हे वेगळे असते आणि वैयक्तीक संबंध है वेगळे असतात, असेही ते म्हणाले.

Share