व्हॅलेंटाईन वीकमध्ये राखी सावंतचे हार्टब्रेक

मुंबईः अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. यावेळेस राखीने व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली जी भलतीच चर्चेत आहे. ही पोस्ट आहे तिच्या हार्टब्रेकची. राखई सावंतने पती रितेशपासून वेगळे झाल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. ३ वर्षी पूर्वी राखी आणि रितेशने लग्न केल होत. आता मात्र ते वेगळे झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CZ65kHePCho/?utm_source=ig_web_copy_link

तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “मला कल्पना आहे की उद्या व्हॅलेंटाईन डे आहे मात्र त्याआधी मी एक निराशाजनक बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी आणि रितेशने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्याला निरोगी आयुष्य लाभो. मला इतके दिवस समजून घेतल्याबद्दल धन्यवाद”, असे राखीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंत यांनी एका मुलाखतीत याबाबद प्रतिक्रिया दिली. त्यात बोलताना त्या म्हणाल्या की, मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आणि तो मला सोडून गेला. बिग बॉसनंतर आम्ही मुंबईत माझ्या घरी एकत्र राहत होतो. पण एकेदिवशी रितेश अचानक बॅग भरून निघून गेला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने तो काही कायदेशीर अडचणीत आला आहे आणि आता त्याला माझ्यासोबत राहायचे नाही, असे सांगत तो निघून गेला असे राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितले आहे.

Share