टीव्ही सेंटर खून प्रकरणातील आरोपीला अखेर बेड्या

औरंगाबाद- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खूनाचे गंभीर प्रकरण वाढत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. अशाच शहर पोलिसांना एका खूनाचा उलगडा करण्यात य़श आलं आहे. २२ दिवसात पोलिसांनी सिध्दार्थ साळवेच्या खूनाचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

औरंगाबाद शहरातील बहू चर्चीत टि व्ही सेंटर येथे एका मजूराचा निर्घृण खून केला गेला होता. हा प्रकार २१ जानेवारी रोजी पोलिसांच्या समोर आला .  त्यानंतर आता २२ दिवसात पोलिसांनी सिद्धार्थच्या मारेकऱ्याचा शोध लावला आहे. दारु पिऊन शिवीगाळ केल्याने सिद्धार्थचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अयाज खान बशीर खान ( वय ३६, रा.रहेमानीया कॉलनी, आझाद चौक) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी.व्ही सेंटर येथील मनपाच्या व्यापारी संकुलाच्या मागील स्टेडियमधील गाळ्यात सिध्दार्थ साळवेचा डोक्यात दगड मारून त्यानंतर शरीर अर्धवट पेटवून खून करण्यात आला होता. गेली २२ दिवस पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत होते. दरम्यान याच भागात दारु पिऊन रात्री स्टेडीयमच्या परिसरात झोपणाऱ्यापैकीच कोणीतरी सिध्दार्थचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे चौकशीमध्ये अयाज खान यानेच सिध्दार्थचा खून केल्याचं तपासात सिद्ध झालं आहे . त्यांनतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Share