रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड

नागपूर : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणुकीत भाजपचे खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते. परंतु, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यानं रामदार तडस यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवडणूक बिनविरोध होणार आहे.

येत्या ३१ जुलै रोजी नागपूरमध्ये कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे खासदार तडस यांचा कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार असून ते स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

कोण आहेत रामदास तडस?

वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस हे भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये दोन लाखांहून जास्त मतं मिळवत त्यांनी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांच पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी आपली ते खासदार म्हणून निवडणू आले. भाजपमध्ये येण्यापूर्वी तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली या विधानपरिषदेतून ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय त्यांनी देवळी नगरपरिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना एसटी महामंडळाचं संचालकपदही दिलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेला खासदारच शरद पवारांची जागा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Share