अखेर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका; नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर अटक केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने काल (बुधवार) जामीन मंजूर केला. त्यानंतर आज (गुरुवार) राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका झाली आहे. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ बाहेर पहारा देत दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल खार पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणा दाम्पत्य मागील बारा दिवसांपासून तुरुंगात होते. राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होऊन काल बुधवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्‍पत्‍याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली.

https://twitter.com/ANI/status/1522134160353030147?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522134160353030147%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F177101%2Fmatoshree-hanuman-chalisa-row-mumbais-borivali-court-issues-the-release-order-of-mp-navneet-rana-and-mla-ravi-rana%2Far

https://twitter.com/ANI/status/1522142180751847424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522142180751847424%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F177101%2Fmatoshree-hanuman-chalisa-row-mumbais-borivali-court-issues-the-release-order-of-mp-navneet-rana-and-mla-ravi-rana%2Far

जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातल्या पाच अटी
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, जामिनावर सुटल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांना या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीही अट घातली आहे. राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांना तपासकार्यात सहकार्य करावे आणि पोलिसांकडून नोटीस दिल्यानंतर २४ तासांच्या आत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहावे, अशा विविध अटी न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.

दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर खा. नवनीत राणा यांची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली. त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खा. राणा यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात ठेवायचे की, डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय होणार आहे. आ. रवी राणा यांचीही तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल होताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशीदेखील संवाद साधला. तत्पूर्वी, सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. नवनीत राणा यांना जेलमधून थेट रुग्णालयात यावं लागलं, याचं वाईट वाटतंय. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात आलोय. ठाकरेंच्या माफिया सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रात आलेत, याची आम्हाला लाज वाटतेय”, असे म्हणत सोमय्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

Share