राऊतांनी आणखी २०-२५ वर्षे विरोधी पक्षात राहावं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ठाणे : संजय राऊत आमच्या सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असा टोला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.  रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये काल काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. काल पहाटेच संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत केले. यावर प्रसार माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय राऊत यांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Share