समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. तसेच त्यांच्या पीएला या अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,अबु आझमींना याआधीही जीवे मारण्याची धमकी आली होती. जुलै २०२२ मध्ये आझमींच्या स्वीय सहायकानेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आझमींच्या पक्षाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यामुळे त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

Share