वाईन व्यावसायिकासोबत राऊतांची पार्टनरशिप-किरीट सोमय्या

मुंबईः राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस राज्या सरकारने परवानगी दिली आहे. या निर्यांचा महाविकास आघाडीने स्वागत केला तर भाजप विरोध दर्शवत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच हल्ला केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राऊतांनी आपले आरोप खोडून दाखवावेच असे आव्हानही त्यांनी दिले आहे. राऊत म्हणतात की ,वाईन ही दारु नाही आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिजनेस पार्टनरशिप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे. मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. यांचा व्यवसाय हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.

मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक १०० कोटींची आहे. कंपनीने २ जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे. इतकेच नाही तर, वैजनाथ देवस्थानची जमीन ठाकरे सरकारने हडप केली. त्या जमिनीवर तहसीलदार वर दबाव आणत आहेत. ठाकरे सरकारचा वैजनाथ देवस्थान जमीन मध्ये थेट संबंध आहे, असा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला आहे.

Share