दिल्ली- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कार यादीत आठ खेळाडूंचा समावेश आहे. यात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून परम विशिष्ट सेवा पदक देखील देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच यात देवेंद्र झाझारियाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२० वर्षीय नेमबाज अवनी लेखरा, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अँटिल या पॅरालिम्पिक क्रीडापटूंनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ९३ वर्षीय मार्शल आर्टिस्ट शंकरनारायण मेनन चुंडेल, माजी आंतरराष्ट्रीय कुंग-फू विजेते फैझल अली, भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद संखवालकर आणि हॉकीपटू वंदना कटारिया यांचाही पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
Microsoft CEO Satya Nadella, Alphabet CEO Sundar Pichai, SII MD Cyrus Poonawalla to be conferred with Padma Bhushan
Olympians Neeraj Chopra, Pramod Bhagat & Vandana Kataria, and singer Sonu Nigam to be awarded Padma Shri pic.twitter.com/J5K9aX9Qxz
— ANI (@ANI) January 25, 2022
पद्मभूषण पुरस्काराचा मानकरी –
पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझारियाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देवेंद्र हा भारतातील एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. २००४ अथेन्स येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये त्याने प्रथम सुवर्णपदक जिंकले होते. २०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतही त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती. २०२० टोक्यो येथे पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला .
पद्मश्री पुरस्कार –
- सुमित अंतिल – पॅरालिम्पिक भालाफेक (हरियाणा)
- प्रमोद भगत – बॅडमिंटन (ओडिशा)
- नीरज चोप्रा – भालाफेक (हरयाणा)
- शंकरनारायण मेनन – मार्शल आर्ट्स (केरळ)
- फैसल अली दार – कुंग-फू (जम्मू आणि काश्मीर)
- वंदना कटारिया – हॉकी (उत्तराखंड)
- अवनी लेखरा – पॅरालिम्पिक नेमबाज (राजस्थान)
- ब्रह्मानंद संखवाळकर – फुटबॉल (गोवा)