सरकारने लोकशाही मार्गाने काम करावे, दरेकरांचा सल्ला

मुंबईः सुप्रीम कोर्टाने आज एक मोठा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबद भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या १२ आमदारांचे ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले होते.

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महत्त्वाचं विधान करत मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारला सणसणीत चपराक सर्वोच्च न्यायलयाने दिली आहे, असे म्हटलेय. सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे सरकारवर ओढल्याचे त्यांनी म्हटलेय. सूड भावनेने केलेल्या कारवाईला सुप्रीम कोर्टाने उत्तर दिले असल्याचे प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. सरकारने या निर्णयातून धडा घ्यायला पाहिजे, असे विधान त्यांनी केलंय. आपण दडपशाही करु शकत नाही, न्यायालयाच्या निर्णयाला नाकारु शकत नाही, आता तरी सरकारने लोकशाही मार्गाने काम करावे, असा सल्ला प्रवीण दरेकरांनी यावेळी दिलाय.

केवळ सरकार अडचणीत येऊ नये, केवळ बहुमतासाठी भाजपला अडवता कसे येईल, यासाठी भाजपच्या आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेतला होता, असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे. पण न्यायदेवतेवर लोकांचा विश्वास आहे, हे या निर्णयाने पु्न्हा एकदा सिद्ध केलय. आम्हाला न्यायदेवतेने न्याय दिलाय, याचा आम्हाला आनंद आहे, असे विधान प्रवीण दरेकरांनी केलंय. दरेकरांनी म्हटलंय की, विनायक राऊत साहेब संजय राऊत साहेबांना सांगा.. की राणेंविरोधात निर्णय आला की न्यायालयाचे कौतुक… आणि मग विरोधात निर्णय आला, की लोकशाहीचा गळा घोटला असे म्हणायंच… हे चुकीचंय…!

मोठी बातमी ! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे

 

कोण होते निलंबित १२आमदार?

१. अतुल भातखळकर

२. राम सातपुते

३. आशिष शेलार

४. संजय कुटे

५.योगेश सागर

६. किर्तीकुमार बागडिया

७.  गिरीश महाजन

८. जयकुमार रावल

९. अभिमन्यू पवार

१०.  पराग अळवणी

११. नारायण कुचे

१२. हरीश पिंपळे

Share