पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. २१ मे रोजी केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २२ मे रोजी पेट्रोलच्या दरात साडेनऊ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे सहा रुपयांची कपात झाली तेव्हापासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय ?

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.७४ रुपये तर डिझेलचा दर ९३.२३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.२३ रुपये तर डिझेलचा दर ९२.५८ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share