5G तंत्रज्ञानासाठी रिलायन्स जिओ सज्ज,१००० शहरात देणार सेवा

मुंबई-   5G तंत्रज्ञानाविषयी भारतात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. यासाठी भारतात केवळ १५ मोठ्या शहरांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये दिल्ली , कोलकत्ता , मुंबई ,पुणे या शहरांचा समावेश आहे. मात्र आता रिलायन्स जिओने देशातील हजार शहरांमध्ये सेवा देण्याची घोषणा केली आहे.

जिओ सुरुवातीला देशातील १००० हजार शहरांमध्ये या तंत्रज्ञानाची सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी जिओकडून 5G चे  प्लॅन देखील घोषित करण्यात येणार आहेत. हे तंत्रज्ञान वेगाने उभारण्याचे काम जिओ करत असून रेंजच्या समस्या येवू नये यासाठी मोबाईल टाॅवरला वीजेची उपलब्धता देखील वाढवण्यात येणार आहे.  ज्या शहरात जास्त डेटा वापरल्या जातो त्या शहरामध्ये सुरूवातीला हे तंत्रज्ञान येणार असून या भागाची ओळख पटवण्यासाठी जिओने हिट मॅप्स्,3डी मॅप्स्आणि ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली असून लवकरच 5G सुविधा ग्राहकांच्या सेवेत रुजु होणार आहे.

 

-जयश्री ओपळकर

Share