मुंबई : नेहमी आपल्या वादग्रस्त वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांची २४ तासांमध्ये मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे, असं म्हणत महेश तपासे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. @supriya_sule ताई यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मंत्री @AbdulSattar_99 यांची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.@NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil#abdulsattar #NCP pic.twitter.com/KSqUlNPyll
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) November 7, 2022
‘सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे, त्यामुळे अब्दुल सत्तार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल,’ असा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.
So the mysoginistic leaders continue their tirade against Supriya and by default all women, who stand up to their macho behaviour and expose their character and abilities. (1/3) pic.twitter.com/zIBWhVFsNu
— sadanandsule (@sadanandsule) November 7, 2022
सत्तारांवर टीकेची झोड
महाराष्ट्रातील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.