राजकारणाची इतकी नीच पातळी महाराष्ट्राने कधीही पहिली नव्हती – नाना पटोले

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संत्तारांच्या या विधाना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. मात्र, सत्तारांच्या टीकेनंतर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

यासंदर्भात नाना पटोले बोलताना म्हणाले की, ईडी सरकारचे मंत्री आता महिलांना उघड शिव्या देऊ लागले आहेत.. राजकारणाची इतकी नीच पातळी महाराष्ट्राने कधीही पहिली नव्हती!! अब्दुल सत्तारांचा आणि महिलाविरोधी ईडी सरकारचा तीव्र निषेध पटोले यांनी व्यक्त केला आहे.

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.

Share