राज्याच्या पर्यटन राजधानीला निर्बंधांचा फटका

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळे आहेत. जगविख्यात वेरूळ अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, औरंगाबाद लेणी तसेच विविध छोटी मोठी पर्यटन स्थळे असल्याने राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबादला मानले जाते. परंतू राज्य सरकारने निर्बंध लावण्याने हि सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत आणि यावर अवलंबून असणारे कुटुंब मात्र परत एकदा बेरोजगार होणार आहेत.

शहरात दर वर्षी विविध भागातील २० ते २५ लाख पर्यटक येतात. जानेवारी आणि फेब्रुवारीत पर्यटकांचा ओघ जास्त प्रमाणात असतो.त्यामुळे व्यावसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. ५०० कोटींची उलाढाल पर्यटनामुळे जिल्ह्यात होते. हाॅटेल, रेस्टाॅरंट, खासगी वाहने, पर्यटन स्थळी असलेली छोटी मोठी दुकाने यांचा उदर्निवाह हा पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असतो. मात्र आता हे पुर्णता बंद केल्याने या ठिकाणच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. दरम्यान या व्यावसायीकांकडून निर्बंध लावत पर्यटन स्थळे खुली ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Share