शिव जयंतीला निर्बंध; पत्रकार परिषदेचं काय? भाजपाचा सवाल

मुंबई : शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. यावर भाजपच्या वतीने संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला गेला आहे. संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का? असे वक्तव्य भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजपच्या अधिकृत ट्विटमध्ये म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदचा सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईतील रस्ते बंद करण्यात आले आहेत. संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Share