संजय राऊतांची सेना भवनात उद्या पत्रकार परिषद

मुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या दुपारी चार वाजता सेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राऊतांनी  ट्विट करत दिली आहे. त्यामुळे हे भाजपाचे साडेतीन लोक कोण? संजय राऊत नक्की कोणते खुलासे करणार ? याकडे सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं होतं. या पत्रकार परिषदेत ते कोण हे उलगडणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी या आधीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. याच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडीचा सर्वात मोठा घोटाळा सर्वासमोर उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता संजय राऊत थेट ईडीबाब नेमके कोणते गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Share