मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.
१० ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलायाने वेळेअभावी जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली होती. त्यानुसार, पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. मात्र, आजचीही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
Shiv Sena leader and MP Sanjay Raut's bail hearing adjourned for tomorrow. He was produced in the PMLA court after his judicial custody ended.
Sanjay Raut has been arrested by the ED in the Patra Wala Chawl case. pic.twitter.com/Zi32EDWSZl
— ANI (@ANI) October 17, 2022
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.