नारायण राणेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्दात टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता, ते अश्लाघ्य आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली.

दरम्यान, दावोसमधून काय येणार हे माहिती नाही. पण, महाराष्ट्रात नाकाखालून जे काही प्रकल्प पळवून नेले आहे, ते आणून दाखवावे. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प हे गुजरात आणि इतर राज्य घेऊन ते आधी घेऊन आला तर दावोसला जाण्याला अर्थ आहे. दावोसला काय घडतं हे चांगलं माहिती आहे.५ लाख कोटी करार केले असे होता. पण, इथं ते खरंच आले का हे अजून काही सिद्ध होत नाही. पण, फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प जे आधी आले होते आणि येणार होते ते प्रकल्प आणून दाखवा. दावोसला जाण्याऐवजी तुम्ही गुजरातला जा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Share