ईडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीला आपण पूर्ण सहकार्य केले आहे, माझ्याकडे ३० दिवसांची मुदत असून न्यायालयात दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली

गेल्या आठवड्यात माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यासंदर्भात मला आणि माझ्या कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आल्यानंतर कायादेशीर प्रक्रिया मी पूर्ण करतोय. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे ईडी कारवाई विरोधात ३० दिवसांच्या आत अपील करणार आहे. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला अधीन राहून मी पुढची कारवाई होईल.

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की,  हे २०२२ आहे. आणि २४ नोव्हेंबर रोजी माझ्यावर ईडीनं कारवाई केली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यानंतर माझ्यावरील ती पहिली कारवाई होती. पण त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. पण तेव्हा सगळ्यांनी मला तुमचं काही संपलेलं का? असा प्रश्न विचारला. मी त्यावेळी सांगितलं की, माझी न्यायलयीन लढाई सुरु आहे.

शिवसेना प्रवक्ता म्हणून मी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि त्यानंतर माझ्यावर झालेली कारवाई. कदाचित केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षामुळे माझ्यावर ती कारवाई झालेली असेल. आता अनेकांवर, राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर या कारवाय होत आहेत. पण माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्यामुळे मी भविष्यातही सुरु ठेवीनं. असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Share