“जब तक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…”

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले आहेत. पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या  उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून शिवसेनेला खातं उघडण्यात अद्याप यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टॅग करून ट्विटरवर निशाणा साधला आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ ट्विट म्हटलं की,  “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं..जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता – इति सर्वज्ञानी”, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना देखील टॅग केलं आहे.

दरम्यान शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेशमध्ये २२ ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. मात्र, पहिल्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये शिवसेना उमेदवारांच्या वाट्याला अद्याप यश आलेलं नाही.

Share