‘धर्मवीर’ चित्रपटातील बाळासाहेबांच्या भुमिकेवरुन उचलला पडदा;सोशल मिडियावर गुरुपौर्णिमा गाण्याची चर्चा

महाराष्ट्राला गुरु शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेले ज्यांचे शिष्यत्व पत्कारुन आजही अनेक जण त्यांच्या वाटेवर चालतात. राजकीय क्षेत्रातील गुरुशिष्यांची आदर्श ठरावी अशी एक जोडी या महाराष्ट्राने बघितले आहेत. ती जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे. त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं, जी भक्ती दुर्गामाते साठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. त्यांच्या याच गुरूभक्ती चा दर्शन धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातही होणार आहे .आज चित्रपटातील गुरुपौर्णिमा हे गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलय. गुरुपौर्णिमा गुरूचा नाहीतर शिष्याचा दिवस आहे. असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडते, अशी त्यांची श्रद्धा होती. आनंद यांची श्रद्धा बाळासाहेबांच्या प्रति होती तशीच श्रद्धा आनंद दिघे बद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू-शिष्याच्या नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपट आणि गाण्यातून उलगडणार आहे.
संगीता बर्वे यांचे शब्द असलेल्या या गाण्याला अविनाश-विश्वजीत यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मनीष राजगिरे यांनी हे गाणं गायलेय. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तस्वीर, आणि त्या पुढ्यात खुर्चीवर बसलेले बाळासाहेब आणि त्यांच्या चरणी बसलेले आनंद दिघे हे सर्व
भरल्या डोळ्यात साठवणारा एकनाथ शिंदे. असच सहज सुंदर पण तितकाच रोमहर्षक दृश्य या गाण्यात रेखाटण्यात आला आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी निस्वार्थपणे कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि केवळ सामान्यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यामधून आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसतोच पण त्यांच्या आत आलेल्या एक हळवा शिष्य ,गुरुं पुढे निस्सीम श्रद्धेने , आदराने नतमस्तक होणारा शिष्य अशी त्यांची एक बाजू प्रेक्षकांना गुरुपौर्णिमा या गाण्यातून बघायला मिळणार आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंत पाध्ये या अभिनेत्याने साकारलेली आहे. या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रसाद ओक, क्षितिज दाते, त्यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लूकवरही रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी मेहनत घेतलेली दिसून येते.

Share