ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये झाला होता. त्यांची अत्यंत खडतर परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देगलूर महाविद्यालयातून पदवी घेतली. नंतर एम. ए. ला मराठवाडा विद्यापीठातून केलं. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती.

पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात १९ वर्षे अध्यापनाचे काम केलं. नंतर ते १९९६ ते २००६ या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. २००५ ते २०१० अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु देखील होते. कुलगुरू म्हणून मलेशिया येथील कुलगुरू परिषदेत सहभाग घेतला होता. ते महाराष्ट्रा शासनाच्या  भाषासल्लागार समितीचे अध्यक्ष देखील होते.

Share