छोट्या पडद्यावरील ही सर्वात महागडी अभिनेत्री

मुंबईः अनुपमा ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. प्रेक्षकांची मने या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने जिंकली आहेत. अनुपमाची भूमिका मालिकेत साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुपाली ही छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

https://www.instagram.com/p/CYs0tmzhaKE/?utm_source=ig_web_copy_link

रिपोर्टनुसार, सुरुवातीला एका दिवसासाठी रुपाली १ लाख ५० हजार रुपये मानधन घेत होती. आता रुपाली एका दिवसासाठी ३ लाख रुपये मानधन म्हणून घेते. छोट्या पडद्यावरील सगळ्यातजास्त मानधन घेणारी रुपाली ही अभिनेत्री आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली अभिनेत्रींमध्येच नाही, तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते राम कपूर, रोनित बोस रॉय सारख्या कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेते. तर अनुपमा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुधांशु पांडे आणि गौरव खन्ना हे रुपालीच्या तुलनेत खूप कमी मानधन घेतात. असे म्हटले जाते की दोन्ही अभिनेत्यांना १.५ लाख रुपये मानधन म्हणून मिळते.

Share