शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबाद मधील खाजगी रुगणालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती.

Share