शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  पावनखिंड आणि फत्तेशिकस्त या चित्रपटा नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचाच शेर शिवराज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर हा ‘शेर शिवराज’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफझल खानाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय २२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी कॅप्शनमध्ये दिग्पाल यांनी लिहिले, ‘होरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला.दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह. ‘शेर शिवराज’ २२ एप्रिल २०२२’

Share