SHESHANCHE PROYOPOWESHAN (शेषांच प्रायोपवेशन….)

भारताच्या शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या क्रांतीची फळे, हा देश येणाऱ्या दहा वर्षात चाखायला लागेल. त्यासाठी लागणारा वेळ, शिक्षण घेणाऱ्या पिढीचे सातत्य, राजकीय धोरण, नैसर्गीक संपन्नता यांचा परिणाम निश्चितच असेल. यावर बराच वादंग होऊ शकतो,  त्यातच आपण आताशा कोविड परिणामांची फळे भोगायला लागलो आहोतच. देशच नव्हे, विश्व यातून जात आहे. आता नेमकं कशाच्या मागे जावे ? हा प्रश्न मागील पिढ्यांना सतावत आहे. येणाऱ्या पिढ्यांची देखील सातत्याने, संभ्रमावस्था झाली आहे.

AI नावाचे भूत, या पिढीच्या मानगुटीवर आणून बसविण्यात आले आहे. या नव शोधाचा अर्थ ,प्रत्येक जणासाठी,  त्या आंधळ्यांना दाखविलेल्या हत्तीच्या कथेसारखा आहे. कोण काय कसा अर्थ काढेल, त्याचा समाज माध्यंमांवर विपरीत वापर करेल, याचा देखील नेम नाही.  पुस्तकांच्या जगात होत चाललेला अकाल, पुस्तकांबद्दल नविन पिढीचा आकस, हा पुस्तक व्यवसायाला घरघर लागते की काय ? अशी शंका निर्माण करणारा आहे.  १९५० च्या नंतरच्या, आज रोजी जिवंत असलेल्या, मागच्या पिढ्यांनी जिव ओतून पुस्तक जमा करण्याचा छंद जोपासला. वेळप्रसंगी चैनीला कात्री लावत, पुस्तक खरेदी चालू ठेवली. हि संपंदा जपता जपता, कैक, पुस्तक प्रेमी या जगातून निरोप घेत आहेत. काही पुस्तकप्रेमींच्या पाल्यांनी, उच्च शिक्षण घेत देश त्याग करत ,युरोप देशात, परदेशात बस्तान बसविले. त्यांना त्यांचे पालकच तिकडे नेणे जड झाले आहे.  पुस्तकांची त्यात काय बात ? ज्या पुस्तक प्रेमींची पुढली पिढी याच देशात, पण मेट्रो सिटीत दाखल झाली, त्यांनी देखील, जागा नाही, वन बिएचके आहे, तुमची पुस्तक कुठं ठेवायची, एक तर तुम्ही पुस्तकांसोबत राहा, नाहीतर आम्हाला एकटं राहू द्या, अशी धोरणे अंगीकारली आहेत.

पुण्यातलं एक जुनजाणत पुस्तकांच दुकान कम वाचनालय, बंद पडलं, काय गजहब झाला. इकडे त्याच दुकानातील पुस्तक खरेदी करणाऱ्या पुस्तकप्रेमी संग्रहकांना, आज त्यांच्या जिवापाड जपलेल्या पुस्तकांना, हयातीतच तिलांजली द्यावी लागत आहे. यासारख दुख: ते कोणत ? अस असताना पुढचा एक धक्कादायक प्रकार अनुभवयाचा आहे.

जुन्या जाणत्या पिढीतल्या लेखकांनी आता लेखन काम थांबवल आहे.  १९७० ते २०१० हा तसा लेखकांचा सुवर्ण काळ. या काळात बहरलेली प्रतिभावंतांची लेखणी, आणि वाचकांची अनुभूती यांची खरी उतरंड आताशी दिसू लागली आहे. सावरकरांसह समकालीन विषयावर प्रगल्भ लिखाण करणाऱ्या, या लेखकाची भाषणे त्याकाळी रांगा लावून ऐकली गेली. तांत्रिक शिक्षणात निष्णात असलेल्या, या लेखकाची मुलं आज आघाडीच्या वैद्यक शास्त्रात निपूण आहेत.

जुन घर ज्यात हे कुटूंब वाढलं, त्यांनी प्रगती केली, त्यातून स्थलांतरीत होत, शहराच्या नवीन भागात स्थिरस्थावर होत, तिथे नवीन भव्य वास्तूत प्रवेशला. त्या ठिकाणी, वडीलांसाठी स्वतंत्र अशी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि त्यांना सांगण्यात आलं, आता जुनी पुस्तक जुन्याच घरी राहू देत. आपणासाठी हे नवीन छोटेखानी कपाट, टेबल व खुर्ची. लेखक महोदयांची खरी कुचंबणा येथेच सुरु झाली. तांत्रिक शिक्षणात निपुणता असली तरी, मोबाईल युगाशी तसे ते हटकूनच होते. संदर्भासाठी कधीच त्यांनी इंटरनेट वरील संदर्भांचा विश्वास केला नाही. त्यांनी त्यांच्या संग्रही जमा केलेला दस्तावेज हाच त्यांचा डाटा सेंटर. हा दस्तावेज प्रकृती , वय, या सर्व कारणांनी व मुलांच्या वर्तनानी दुरावला . हा त्रास खरचं कोण्या  वैराच्या नशीबी येऊ नये. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य काय असत ? ते हे पाहीलयावर कळतं. नुसतं अभिव्यक्ति स्वातंत्र्य असून चालत नसते . तर त्या अभिव्यक्तिला पोषक वातावरण, आवश्यक ती साधन सामुग्री उराशी असायला हवी. एवढ उच्च शिक्षण त्या पाल्यांना देऊन काय फायदा झाला ? आज जन्मदात्याचा एवेज त्याला लाभू देत नसतील तर त्यांचा सुशिक्षित असण्याचा उपयोग तो काय ?

लेखक महोदयांचे वारंवार हात लेखणी पर्यंत जात असायचे. आणि ऐवेजाची आठवण झाली के ते ओशाळायचे. त्यांच्या ख्यातमान लेखणीला सलाम करीत, त्यांच्या भेटीला रोज प्रकाशक, मुलाखतकार, विद्यार्थी, समकालीन लेखक येत असायचे. आव भगत व्हायची. लेखक महोदयांसोबत गप्पा, चहापान व्हायचं. प्रत्यक्ष भेटीला आलेला प्रत्येकजण जाता जाता प्रश्न विचारयेचा, “आता आपला नवीन लेखांचा स्वाद आम्हाला कधी चाखायला मिळणार ?”, “नवीन काय लिहतायं?”, “या दिवाळी अंकासाठी काही लेख देणार का?”  या अशा अनेक प्रश्नांनी लेखक रोज जखमी होत असायचा.  तो प्रश्नकर्त्याच्या चेह-याकडे शुन्य नजरेने पाहयचा. प्रश्नकर्ता रिता, लेखक मानसिक गुलामगिरीच्या गर्तेत. एक दिवस रागारागात त्यांनी पेन, कागद, सर्व साहीत्य भिरकावून दिलं, आणि रागाच्या भरात प्रण केला, आता लिखाण करणारच नाही. लेखणी त्यागली. हा, साहित्यीक खुन होताना, कुंटूंबानं पाहीलं, अनुभवल. त्यांना तो खुन कदाचीत घडवून आणंयचा होता. एक प्रतिभा संपविली. पुढची पिढी एका सिध्दहस्त लेखनीला कायमची मुकली. याच कारणांनी सावरकरांनी शेवटी प्रायोपवेशन केलं असांव का ?

Share