मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होत. संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली होती. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. परंतू यावर भाजपाकडून ट्विट करत सडकून टिका करण्यात आली आहे.
शिवसेनेचे इंटरनॅशनल प्रवक्ते यांची पत्रकार परिषद म्हणजे,
'खोदा पहाड़ निकला चुहा'
चुई चुई करून बिळात गेला!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 15, 2022
भाजपाच्या अधिकृत ट्विटमध्ये म्हंटल आहे की, शिवसेनेचे इंटरनॅशनल प्रवक्ते यांची पत्रकार परिषद म्हणजे ‘खोदा पहाड़ निकला चुहा’ अशी अवस्था झाली आहे. असा पलटवार करत भाजपकडून राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
ते साडेतीन लोक कोणते ?
दरम्यान, याआधी भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील, असं म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “उद्यापासून तुम्हाला कळेल. कोण अर्धा आहे, कोण पाव आहे, कोण चाराणेवाला आहे. हे जसजसे अटक होतील, तसतसे तुम्हाला समजतील”.असं राऊत यांनी म्हंटल आहे.