फडणवीसांच्या काळातील महाआयटी मोठा घोटाळा-राऊत

मुंबईः शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा प्रश्न देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

महाआयटी २५ हजार कोटींचा घोटाळा
राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे. ५ हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आलेला आहे. असे ते म्हणाले.

ईडी दूधवाल्या ओळखते का?
मागील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना खासदार संजय राऊत यांनी हरयाणातील एन नरवर या दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की एन नरवर हा हरयाणातील एक दूधवाला आहे. मी ईडीला विचारतो की, या नरवरला ओळखता का? हा दूधवाला आहे. या दूधवाल्याकडे ७ हजार कोटींची संपत्ती आहे. हा दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा बनला. त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे. असे राऊत म्हणाले.

मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार
देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.

Share