राऊतांच्या पत्रकार परिषदेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबईः शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. स्फोटक परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी काही गंभार आरोप केले. यावर आता काॅंग्रेसने प्रतिक्रीया दिली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका मांडताना म्हटले की, “संजय राऊत यांनी जी पत्रकारपरिषद घेतली त्यात खूप वास्तव समोर आलेले आहे. आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, असा हेका लावणारी भाजपा आज त्यांच्या भ्रष्टाचारांमुळे संपूर्ण उघडी झाली आहे. या निमित्त ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी काँग्रेसची आहे. ”

 

 

Share