नाटकातील घोडी अनं नौटंकी थाट! आढळरावांची कोल्हेंवर टिका

पुणे-  राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज पुण्यातील निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोड्यावर मांड ठोकत शर्यतीत सहभाग नोंदवला. तसेच कोल्हे यांनी २०१९ साली निवडणूकीच्या प्रचार सभेत निवडून आल्यानंतर बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार असल्याचं सांगितलं होतं ते आज त्यांनी पूर्ण केलं असं बोललं जात असताना मात्र त्यांचे विरोधक  माजी खासदार शिवाजी आढाळराव पाटील यांनी हा दावा मोडीत काढला आहे.

शिवाजीराव आढाळराव पाटील म्हणाले की, आज खंडोबा यात्रे निमित्त आयोजित केेलेल्या बैलगाडा शर्यतीत खासदार अमोल कोल्हे घोडीवर बसले आणि मी दिलीले शब्द पूर्ण केला आणि आढाळरावांच आवाहन स्वीकारल अशा खोट्या वलगणया केल्या. कोल्हे यांनी जो शब्द दिला होता लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान बैलगाडा चालू होतील त्या दिवशी पहिल्या वेळी घोडीवर बसेल अशा प्रकारचं वचन जनतेला दिलं होतं. मात्र बैलगाडा शर्यतीवरच्या बंदी १६ डिसेंबर २०२१ रोजी उठवण्यात आली. त्यानंतर ११ जानेवारी पासून शर्यती सुरु करण्यात आल्या आहेत. नानोली आणि लांडेवाडी येथे सुरु  झालेल्या शर्यतीत त्यांना आवाहन केलं होतं परंतू ते ११ तारखे नंतर १६ तारखेला आले. ते पण पहिल्यांदा नाही तर शेवटी आले. असे आरोप आढळरावांनी केले आहेत.

पुढे ते म्हणाले की , कोल्हे आल्यानंतर ते घोडीवर बसले परंतू घोडी मागे आणि बैलं पुढे पळत होती. असा प्रकार करत कोल्हे म्हणाले की शब्द पुर्ण केला परंतू  त्यांनी कोणत्याही प्रकारे माझं आवाहन स्वीकारलेलं नाही आणि शब्दही पूर्ण केलेला नाही. बैलगाडा तज्ञ आणि शेतकऱ्यांना हे माहितीये की, ती घोडी नाटक, तमाशा अन् चित्रपटात वापरली जाणारी घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं आढळराव म्हणाले. जसं नाटकात ते लोकाना बनवाबनवी करण्याचं काम ते करत आहेत असा आरोप आढळरावांनी केला.

 

Share