राऊतांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे.  शिवसेना खा. संजय राऊत यांचं लक्ष हे शिवसेना वाढवण्यावर नाही. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  खुर्चीवर आहे.  तसेच संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केले आहे.

संजय राऊत का बेजबाबदारपणे घामाघूम होऊन बोलत होते? प्रविण राऊतांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर हा थयथयाट सुरू झाला. का फक्त आरोप करता? पुरावे द्या ना? सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण लागतात? त्यांच्या नावाने इतके व्यवहार कसे करता? त्यांच्या कंपनीत संजय राऊतांच्या मुली कशा संचालक असतात? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. तर त्यांचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत तिथे आहे. ते शिवसेनेचे नाही तर कदाचित राष्ट्रवादीचा आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटव तुलाच मेन करतो आम्ही. कारण उद्धव ठाकरे, जेव्हा पहिल्यावेळी शरद पवारांनकडे गेले तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. त्यांची पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण व्यवहाराबद्दल संपूर्ण मला माहिती आहे. आम्ही का गप्प बसलो आहे. पण तू थेट ३०० कोटी घेतले असे वक्तव्य करतो. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये. पुजा करावी आणि चौकशी करावी.” असंही राणे म्हणाले आहेत.

Share