शिवरायांचा जन्म कोकणात झाला; भाजप आमदार प्रसाद लाड यांचे वक्तव्य

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात वातावरण तापले आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्यकेलं आहे. त्यामुळे लाड यांच्या वक्तव्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,असे राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी असे तुम्ही विचाराल. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली,असे प्रसाद लाड म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत प्रसाद लाड हे जवळ ठेवलेल्या चिठ्ठीमधून काहीतरी वाचत होते असेही दिसून आहे.

Share