शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना शिव्या द्या – संजय राऊत

शिर्डी : गद्दार आमच्या सारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. त्यांना शिव्या देण्याची एवढीच हौस असेल तर महाराष्ट्रात अशी अनेक  प्रकरण घडत आहेत. त्यांनी स्त्यावर उतरलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या? असा सवाल करतानाच द्या ना शिव्या. शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे. शिव्या द्या. राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या; असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिले आहे. ते शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की,भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला द्या शिव्या. हिंमत आहे? नाही. महाराष्ट्रावर कर्नाटकाचा हल्ला होतोय. बोम्मईंना शिव्या देताय? नाही. शिव्या कुणाला देताय शिवसैनिकांना. निष्ठावंतांना. जरूर शिव्या द्या. तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यांच्या शिव्यांचा काही परिणाम होणार नाही. हे लोक वेडे झाले आहेत. वेडे लोक आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

Share