मुंबई- मुंबई उपनगरा जवळील १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत सामविष्ठ करणार असल्याचं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. भांडर्ली तसंच आसपासच्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आहे.
१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणा नुसार गावात सुविधा पुरवू शकत नाही. तसेच शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने हा विकास गावातही व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून वगळली गेली होती. आता पुन्हा ती समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शिंदे यांनी ग्रामास्थाना आश्वासन देत लवकरच हे काम होईल अशी आशा व्यक्त केली आहे.