मुंबई- आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार असं म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दोपोलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील विकास कामांंमध्ये निधीची पळवापळव होत आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईत नगरविकासचा निधी मिळतो, तसेच मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. परंतु विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. आम्ही म्हणायचं की आमचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ मात्र पवार सरकार घेतं आहे, असं गजानन किर्तीकर म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले , यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादीला ५७ टक्के निदी देण्यात त्या पाठोपाठ काँग्रेस आणि मग शिवसेनेला निधी वाटप करण्यात आल्याचं देखील किर्तीकर बोले आहेत.