पंजाब- निवडणुकांच्या आधी जवळपास सहा महिने पंजाबमधील राजकारण काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे ढवळून निघालं. नवज्योत सिंग सिद्धू यांची आक्रमक भूमिका, अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि दुसऱ्या पक्षाची स्थापना, भाजपासोबत हातमिळवणी, चरणजीत सिंग चन्नी विरुद्ध सिद्धू असा थेट संघर्ष झाला. यामुळे काँग्रेससमोर अनेक आव्हानं उभी राहिली होती. आणि काँग्रेससाठी पंजाब निवडणुकांचा पेपर कठीण ठरला, अशी वर्तवण्यात आलेली शक्यता आता खरी ठरली आहे .
The voice of the people is the voice of God …. Humbly accept the mandate of the people of Punjab …. Congratulations to Aap !!!
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 10, 2022
मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्येच पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होऊन आम आदमी पक्षाकडे एकहाती सत्ता जाताना दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य करत उलट आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं आहे.त्यांनी ट्वीट करत म्हंटल आहे की, लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकार करतो. आम आदमी पक्षाचं अभिनंदन!” असं ट्वीट सिद्धू यांनी केलं आहे.