‘साहेब मी गद्दार नाही’ राऊत बंधुंनी बंडखोरांना पुन्हा डिवचलं

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या २३ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने आजच्या दैनिक ‘सामाना’तील पहिल्या पानावर राऊत बंधुंनी जाहिरात देऊन ‘साहेब मी गद्दार नाही’ असं म्हणत गद्दारांना गाडण्याची प्रतिज्ञा केली आहे.

साहेब मी गद्दार नाही! गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र…, असा मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते या टीकेला प्रत्युत्तर देताना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि खाली शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांचा उल्लेख आहे. बाळासाहेबांची उद्या जयंती आहे, पण शिवसेनेची सध्या प्रचंड वाताहत झाली आहे. पक्षचिन्ह आणि नाव गोठवले गेले आहे. पक्षचिन्ह धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल पुढील महिन्यात लागणार आहे.

Share