फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावली, रोहित पवार म्हणाले…

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल पिंपरी चिंडवमध्ये विविध विकास कामांचे उद्धघाटन करण्यास आले होते. त्यावेळी फडणवीसांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावल्याची घटना समोर आली आहे. त्यावरून आता राजकीय वर्तूऴात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत स्वत: फडणवीस यांनीही ‘अशा चिल्लर लोकांना महत्त्व देत नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमंक प्रकरण काय?

पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला होता. गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.

Share