केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ – यशोमती ठाकूर

मुंबई :  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत १०० डाॅलर प्रति बॅरलच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी सामान्य नफा मिळवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ९ रुपयांची वाढ करण्याची गरज आहे, असं म्हंटल आहे.  यावर काँग्रेसने एक मुद्दा लावून धराल आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल-डिजेलच्या किंमती वाढणार असल्याच म्हणत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केले आहे.
मंत्री यशोमती ठाकूर ट्विट करत म्हटलंय की, “मतदान संपताच जर उद्यापासून इंधनाच्या किंमती वाढल्या तर लक्षात घ्या. केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे.”, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

दरम्यान यापूर्वी पेट्रोल- डिजेलच्या किंमतीवरुनच आ. रोहित पवार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. रोहित पवार म्हणाले होते की, पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल. असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. तसेच लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा.जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला होता.

Share