मुंबई- भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला असून यापूर्वी २०१८ मध्ये तिला पुरस्कार मिळाला होता. पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही. भारताच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.
𝗦𝗵𝗲 𝗵𝗮𝘀 𝘄𝗼𝗻 𝗶𝘁… 𝗔𝗚𝗔𝗜𝗡! 🙌 🙌
Heartiest Congratulations to #TeamIndia's @mandhana_smriti who wins the ICC Women's Cricketer of The Year 2021. 👏 👏 pic.twitter.com/ePsRgXcolA
— BCCI Women (@BCCIWomen) January 24, 2022
स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने घरच्या मैदानावर ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले. या दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.