राज्यात ‘हम करे सो कायदा’ असे चित्र – चंद्रकांत पाटील

मुंबईः नाना पटोले यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलच पेटले आहे. नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य भंडारा केले होते. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नारायण राणेच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही , जो न्याय राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली. पण निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने हा मुद्दा चांगलाच तापवला असून आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे पटोलेंच्या वक्तव्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि न्यायालयात दाद मागणार आहे. नाना पटोले म्हणतात मोदींना मारु, नवाब मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखऊ. या सर्वावरुन राज्यात हम करे सो कायदा असं चित्र आहे.

Share